भागवतांचे निरूपण


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेकदा चिंतन, मनन करण्याचे नाट्य वठवत असतो. कसलेल्या नाट्यकलावंताने स्क्रीप्टमधील संवादाची झोकात फेक करावी व अगदी पीटातल्या प्रेक्षकांचीही दाद मिळवावी त्याप्रमाणेच सरसंघचालकही हिंदुत्वाच्या परीघाबाहेर असणार्यांना अशाच संवादाची फेकाफेक करून साद घालतात. पूर्वीचे हाप चड्डीवाले सरसंघचालक असोत की आताचे वेषांतर करून फुल्ल पँटीत रंगमंचावर वावरणारे सरसंघचालक असोत  खोटे बोलणे, गोंधळ उडवणे, यात हे वाकबगर होते/आहेत.

15 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान दिल्ली येथील विज्ञानभवन संघाच्या  कार्यक्रमातभविष्यातील भारत : आर.एस.एस.चा दृष्टिक्षेप या विषयावर सतत 3 दिवस चिंतन झाले. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांनी अशीच फेकाफेक केल्यामुळे संघ बदलला, बदलत चाललाय, गुरूजी माधव सदाशिव गोळवळकरांच्याबँचपासून त्यांनी फारकत घेतली इ. चर्चा काहीजण करू लागले. विज्ञानभवनातील या 3 दिवसीय कार्यक्रमासाठी विरोधकांना चुचकारण्याचाही प्रयत्न संघाने केला. संघाच्या कार्यक्रमाला काँग्रेससह अनेकांना आमंत्रित केल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. कॉर्पोरेटप्रेमी व भंपक राजकारणी असणारा अमरसिंहसारखा एखादाच आर.एस.एस.च्या या कार्यक्रमात उपस्थित राहिला. मात्र इतर नेत्यांनी एकतर भाजपचे निमंत्रण नाकारले किंवा भाजपने निमंत्रणे न देताच निमंत्रण दिल्याचा गवगवा केला असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

दिल्ली येथील विज्ञानभवनमध्ये झालेल्या या 3 दिवसांच्या कार्यक्रमालाभविष्य का भारतअसे नाव देण्यात आले होते. भविष्यातील भारत कसा असावा यासंबंधी वेषांतर केलेल्या मोहन भागवतांचे निरूपण ऐकण्यासाठी त्यांचे भगवान विज्ञानभवनात जमा झाले होते. आपली छबी सुधारण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकदा संघाने केलेला आहे. संघ-बाहेरील अनेकांना याहीपूर्वी आमंत्रित करण्यात आले होते. अगदी तीनच महिन्यांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही संघस्थानी हजेरी लावून आले होते. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांवर त्यांनी स्तुतीसुमनेही उधळली होती व ते भारताचे थोर सुपूत्र असल्याचे प्रमाणपत्रही दिले होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष विजय सोनकर हे तर संघप्रणितदलित-आंदोलन पत्रिकेचे संपादक आहेत. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव हे या पत्रिकेचे नियमित लेखक आहेत. हे दोेघेही दरमहा समरसतेचे रतिब घालतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संघाचे जे विचार-मते आहेत ते सोनकर - जाधव सारख्या आणखीही काहीजणामार्फत सांगितले जाते, वदवून घेतले जाते व त्या बदल्यात संपादकपद बहाल केले जाते, खासदारकी बहाल केली जाते. संघ सर्वसमावेशक असल्याचा, सर्व समावेशक होत असल्याचा आव संघाकडून सतत केला जातोय. विज्ञानभवनमधील 3 दिवसांच्या व्याख्यानातूनही हाच प्रयत्न संघाने केला. संघाचे नियंत्रण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला गेल्या 5 वर्षांत आलेले अपयश झाकण्याचाही प्रयत्न यातून झाला. हे सरकार त्याच्या कर्तृत्वामुळे पुन्हा सत्तेवर येणे अशक्यप्राय आहे हे जसजसे अधिक स्पष्ट होत चालले आहे तसतसे विज्ञानभवनसारखे नवनवीन प्रयोग, नवनवीन संवादाची गरज भासू लागली आहे.

स्वत:च्या बळावर सत्तेत पुन्हा नाही आलो तर किमान सत्तेला चिकटून राहण्यासाठी संभाव्य आघाडी करण्याच्या दृष्टीनेही गुरूजींच्या ‘‘बँच ऑफ थॉट’’पासून दूर गेल्याचा देखावा व कसरत संघाला करावी लागत आहे. ‘‘21 जानेवारी 1930 रोजी डॉ. के.बी. हेडगेवारांनी स्वयंसेवकांनी तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूका काढण्यास व काँग्रेसच्या संपूर्ण स्वराज्यला पाठिंबा द्यावा असे सांगितले होते’’ असे आपल्या निरूपणात मोहन भागवतांनी तद्न खोटे सांगितले. वास्तविक पाहता संघ स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाचे पूजन करावे अशाच सूचना हेडगेवारांच्या होत्या. ‘‘डॉ. हेडगेवार : पत्ररूप व्यक्तीदर्शन’’मध्ये याचा स्पष्ट उल्लेख असतानाही भागवत मात्र खोटे बोलत होते. ‘तिरंगाम्हणजे तीन रंग!https://saptahikyugantar.blogspot.com/ 

तीनहा शब्दच अशुभ असल्याचेऑरगनायजरया संघाच्या मुखपत्रातील संपादकीयात 1947 सालीच लिहिण्यात आले होते. हेडगेवारांच्या नंतर गुरू गोळवलकरांनीही तिरंगी झेंड्याला आक्षेप घेतलेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहन भागवंतानी विज्ञानभवनमध्ये दिलेले व्याख्यान, निवडक प्रश्नांना दिलेली उत्तरे व भविष्यातील भारताचे रंगवलेले चित्र फसवे होते व 2019 च्या निवडणूकांपूर्वी स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा केलेला प्रयत्न हा हास्यास्पद होय! त्यामुळे संघ बदललाय, संघ बदलतोय, गोळवलकरांनी दाखवलेल्या मार्गापासून दूर जातोय या म्हणण्यात सत्यांश नाही हे लक्षात घेतले पाहिजे. खोटे बोलणे, अनेक तोंडाने बोलणे, गोंधळ निर्माण करणे. परिवाराबाहेरील जनतेची चाचपणी करणे ही संघाची रीत राहिलेली आहे, गरज राहिलेली आहे. केंद्रात सत्तास्थानी असलेले संघप्रणित सरकार अपयशी ठरले असताना संघालाही जास्त गरज आहे, व नोटाबंदी, जी.एस.टी., बँकांचे विलिनीकरण, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, महागाई व वाढती बेरोजगारी, रूपयाचे अवमूल्यन, दलित-अल्पसंख्यांकारील वाढते हल्ले, भाजप आमदार, खासदार, मंत्र्यांची बेभान विधाने, महिलांवरील वाढते अत्याचार, लेखक, विचारवंत, पत्रकारांचे खून, राफेल घोटाळा आदी कारनाम्यांमुळे सरकारच्या गढाला धक्के बसणे सुरू झाले आहे.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

पोटनिवडणूकांतही हे धक्के सत्ताधार्यांना बसले आहेत. 2019च्या निवडणूकातील पराभव आता संघ परिवाराच्या नजरेच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा सत्तेवर येण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. विज्ञानभवनातील मोहन भागवतांचे निरूपण हे या डावपेचाचा भाग आहे. संघ बदलल्याचे ते चिन्ह नाही! 
- राम बाहेती

Post a Comment

Previous Post Next Post