'महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य' ग्रंथाचे ४ मे रोजी प्रकाशन

मुंबई : लोकवाङ्‌मय गृहाने प्रकाशित केलेल्या 'महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य' या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी (४ मे २०२४) सायंकाळी ५.३० वाजता मुंबईत होणार आहे. मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग आणि लोकवाङ्‌मय गृह यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


डॉ. वंदना महाजन आणि डॉ. अनिल सपकाळ यांनी संपादित केलेल्या 'महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ. वंदना सोनाळकर व डॉ. उमेश बगाडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. 


या सोहळ्यासाठी साहित्य रसिकांनी व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकवाड्मय गृहाचे प्रकाशक कॉ. राजन बावडेकर व मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post