तिसरे जागतिक युद्ध टाळण्याबाबत...


समाजशास्त्रज्ञसी राईट मील्सयांनी 1958 साली द कॉसेझ ऑफ थर्ड वर्ल्ड वॉर हा राजकीय निबंध लिहीला व त्यांत त्यांनी अमेरिकेतील आर्थिक संपन्नतेस युद्धासाठी उत्पादन करणारी अर्थव्यवस्था कारणीभूत आहे असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच कुठलाही पक्ष (डेमोक्रॅटिक वा रिपब्लिक) सत्तेवर असताना वाढत्या बेकारीच्या संदर्भात वा परकीय देशांमुळे वाढणार्या संकटाच्या संदर्भात लष्करी उद्योगांची वाढ करण्याचा आधार घेतला आहे हेही या निबंधात स्पष्टपणे सांगितले आहे.

पहिल्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने सोव्हिएत युनियनमधील राजकीय स्वातंत्र्याच्या अभावाचा वापर करून घेतला; पण खरा धोका भांडवलशाहीला पर्याय म्हणून सोव्हिएत युनियनमधील साम्यवादापासून होता व तिसर्या जगाला सोव्हिएतमधील भक्कम अर्थरचनेचे आकर्षण होण्यापासून होता. ज्याप्रमाणे उत्तर कोरिया व मुस्लीम दहशतवाद यांना धोकादायक घटक म्हणून जनतेसमोर सादर केले जाते, त्याचप्रमाणे पुतीन नेतृत्वाखालील रशियाला धोकादायक म्हणून सादर करण्यात येत आहे.

अमेरिकेतील संकटे वाढत असताना रशियन धोक्याच्या आधारे राष्ट्रवाद उफाळून आणला जात आहे व त्याचबरोबर नाटोची व्याप्ती वाढविण्यात येत आहे तसेच लष्करी खर्चात प्रचंड वाढ करता येत आहे. परिणामी तिसरे जागतिक महायुद्ध सुरू होण्याचा धोका तीव्र होत आहे व अमेरिकेला यासंबंधी मोठी जबाबदारी स्विकारावी लागेल.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

अमेरिकन माध्यम रुसोफोबिक (रशियाबाबतची भीती) होण्याचे एक कारण हे आहे की रशियाचे हितसंबंध जपणार्या मंडळींचा अभाव अमेरिकेत आहे व दुसरे हे आहे की शीतयुद्धाच्या आठवणी नष्ट झाल्या आहेत व त्याच्यामुळे झालेले भयंकर दुष्परिणामसुद्धा विस्मरणात गेले आहेत. लोकप्रिय भावना ही आहे की शीतयुद्ध म्हणजे अमेरिकन इतिहासातील व्हिएतनामसारखे अतिरेकी अपवाद वगळता सर्वसाधारणपणे अमेरिकन मूल्यांच्या विरोधी असणार्या एकाधिकारशाहीच्या विरूद्ध संघर्षाचा काळ होता. 1945 मधील जर्मन महिलांवरील लाल सैनिकांनी केलेले बलात्कार, हंगेरीतील 1956च्या उठावावरील रशियन दडपशाही, 1968 मधील प्रागच्या उठावाची रशियन गळचेपी, 1979 मधील अफगाणिस्तानातील घुसखोरी आणि संपूर्ण शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत व पूर्व युरोपातील विरोधकांची दडपशाही यांसारख्या क्रूर कारवायांची दखल घेत असताना अमेरिकेने व्हिएतनाममधील केलेली भयावह घुसखोरी व आक्रमण व विनाश, दक्षिण व उत्तर कोरियात केलेल्या अमेरिकन बाँम्ब हल्ल्यातील अत्यंत क्रुरता व विनाश, लाओस-इंडोनेशिया-फिलीपाईस-कंम्बोडिया या देशांत अमेरिकेने केलेला गुप्त व घातक हस्तक्षेप आणिइराण, ग्वाटेमाला, ब्राझील, डॉमनिकन रिपब्लिक, चिली व अन्य देशांतील लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या डाव्या विचारांच्या सरकारांना सत्तेतून बाहेर फेकणेयांसारख्या घटनांकडे गड्डीस नावाच्या टीकाकाराने दुर्लक्ष करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याचप्रमाणे परकीय नेत्यांचे खून करण्यासाठी माफिया शक्तींचा अमेरिकेने वापर करणे व सिआयएच्या साहाय्याने खूनी हल्ले करणे व छळ करणे यांमध्ये अमेरिकेचा हात असणे यांकडे गड्डीस नावाच्या विचारवंताने डोळेझाक करणे नक्कीच हास्यास्पद आहे. लष्करी-औद्योगिकीकरणामुळे अमेरिकन लोकशाही भ्रष्ट होत आहे तसेच आत्मघातकी अण्वस्त्र शर्यत लावण्यामध्ये अमेरिकेचा सहभाग सक्रीय आहे या दोन्ही बाबी खूप गंभीर आहेत.

शीतयुद्धामुळे सर्वांचेच नुकसान झाले असे मिखाईल गोर्बाचेव यांनी सांगितले व आमचेही तेच मत आहे. शीतयुद्धातील पहिला हल्ला जेव्हा अमेरिकन सरकारने स्वत:च्या घटनेविरूद्ध जाऊन व आंतरराष्ट्रीय कायदा पायदळी तुडवून नवीन असलेल्या सोव्हिएत युनियनवर 1918 मध्ये हल्ला केला. ही बाब अजूनही बहुतांशजणांना माहीत नाही. या हस्तक्षेपानंतर अमेरिकेने याल्टा कराराचे उल्लंघन करून सोव्हिएतला सर्व बाजूंनी लष्करी तळांची स्थापना करून घेरले. तसेच सोव्हिएत युनियनचे समर्थन करणार्या पूर्व युरोपातील सरकारांविरुद्ध कारवाया करण्यासाठी आधीच्या नाझी समर्थकांच्या गुप्त टोळ्या त्या देशांत पाठवल्या.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

त्याचवेळेस अमेरिकेने रेडीयोद्वारा सोव्हिएत विरोधी प्रचारयंत्रणा राबविली. इटली व अन्य देशांतील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, तसेच त्यांच्यावर मिसाईल्स रोखण्यात आली. आणि अमेरिकन नागरिकांना रशियन येत आहे अशी भीती दाखवली जात होती.

देशपातळीवर वैज्ञानिकांना व बौद्धिक प्राविण्य असणार्यांना दुय्यम स्थानावर नेण्यात आले होते. साम्यवाद (कम्युनिझम) एक भयावह बाब आहे असा प्रचार करून जनतेविरूद्ध राजकीय दडपशाही केली गेली. विरोधकांना राजकीय विचारसरणीनुसार तुरूंगात ठेवण्यात आले. त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. त्यांना देशद्रोही ठरविण्यात आले. मात्र हेच सर्व पुरोगामी सामाजिक व आर्थिक समानतेची मागणी करीत होते. दुसर्या महायुद्धानंतर डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्या नेतृत्वाखाली व जोसेफ मॅकर्थी यांची धोरणे अंमलात येण्याआधी पाच वर्षे लाल धोक्याबाबत प्रचार करण्यात आला व कम्युनिस्ट, डाव्या व पुरोगामी व्यक्तींविरूद्ध संघटीत हल्ले करण्यात आले. ज्या व्यक्ती हे हल्ले करीत होते त्यांना व्हायरल सेंटर असे संबोधित केले जात होते. या कम्युनिस्टांवरील हल्ल्यांमुळे जे अन्य राजकीय विरोधक होत्या. त्यांचे स्वातंत्र्य सुद्धा संकुचित करण्यात आले व परिणामी अमेरिकेतील सामाजिक लोकशाही नष्ट करण्यात आली.

आता याचप्रमाणे पुतीन यांबाबत महाविशाल उद्योग (कॉरर्पोरेट) भीतिदायक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत व त्याद्वारे युद्धास अनुकूल अशी मानसिकता विकसीत करीत आहेत. 1917 सालातील रशियन क्रांतीपासूनन्युयॉर्क टाइम्सया प्रभावशाली व लोकप्रिय दैनिकाने सातत्याने व खंड न पाडतासोव्हिएत युनियनविरूद्ध भूमिका घेतली आहे. या वर्तमानपत्राने शीतयुद्धाच्या काळात रशियातील घडामोंडीबाबत द्वेषमूलक भाष्य करून अमेरिकन जनतेला चुकीची माहिती पुरविली आहे. जनतेच्या हिताविरूद्ध धोरणे राबविणार्या अमेरिकन सरकारची पाठराखण गेली शंभर वर्षे या वर्तमानपत्राने केली आहे व परिणामी जगातील लोकांसाठी घातक असणार्या धोरणांचे समर्थन केले आहे.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

शीतयुद्ध 1991 मध्ये संपल्यानंतर अमेरिकेने रशियाच्या सीमांच्या बाहेर नाटो सैन्यांचे तळ निर्माण केले व युक्रेन आणि जॉर्जिया या देशांतील कारभारात हस्तक्षेप केला. तसेच लिबीयातील बंडखोर गडाफी सरकारला उलथवून टाकले. आता अमेरिकन सरकार लष्करावर दरवर्षी 70,000 कोटी डॉलर खर्च करते व ही रक्कम रशियाच्या एकूण संरक्षणावरील खर्चापेक्षा दहापटीने जास्त आहे. अमेरिका रशियातील निवडणुकांमध्ये व राजकारणात हस्तक्षेप करीत असते. 1996 च्या तेथील निवडणुकीत अमेरिकेने बोरिस येलस्टीनच्या बाजूने ढवळाढवळ केली होती. याउलट 2016 मधील अमेरिकेतील निवडणूकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा पुरावा उपलब्ध नाही. मात्र तशी बोंबाबोंब मात्र करण्यात आली.

रशियाने कधीही मेक्सिकोत वा कॅनडात लष्करी हस्तक्षेप केला नाही, वा त्यांना कधीही महाग लष्करी मदत केली नाही, वा तेथील राजकारणावर नियंत्रण आणले नाही. रशियाने नेहमीच राजकीय स्तरावर अमेरिकेशी बोलणी करण्याची तयारी ठेवली आहे. तसेच पुतीन यांनी दहशतवादाविरूद्ध युद्धात जॉर्ज बुश यांच्याशी सहकार्य केले आहे. लेनिन यांनी जेव्हा परकीय उद्योगांचे क्रांतीनंतर राष्ट्रीयकरण केले, तेव्हा विशिष्ट अमेरिकन उद्योगांना यातून वगळले जाईल असे सांगितले व त्यासाठी अमेरिकेबरोबर डिप्लोमॅटीक (राजनैतिक) आघाडी करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र अमेरिकेच्या वुड्रा विल्सन यांनी त्यास नकार दिला.

हा सर्व इतिहास लक्षात घेता, आपला दृष्टीकोन बदलून अमेरिका शांतता प्रस्थापित करू शकते. हवामानबदल, दहशतवाद, अण्वस्त्र प्रसार यांसारखे जागतिक प्रश्न सोडविण्यासाठी रशियाबरोबर  सहकार्य करणे आवश्यक आहे. चर्चशी जोडलेले अति प्रतिगामी विभाग व आपल्या उत्पादनात कपात होऊ नये म्हणून शस्त्र उत्पादक व वैमानिक साधनांचे उत्पादक या सर्वांनी शीतयुद्धाचे समर्थन केले. मात्र अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला रशिया पश्चिम युरोपातील देशांवर आक्रमण करेल असे वाटत नव्हते. मात्र लष्करावरील होणारा खर्च वाढवत ठेवण्यासाठी लोकांना सतत भयग्रस्त ठेवणे आवश्यक होते व हेनरी वॉलेस सारख्या पुरोगामी लोकांबाबत राक्षसी प्रतिमा लोकांसमोर सादर केली जात होती.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

ऐतिहासिक जाणीवांचा अभाव असल्यामुळे, आपण बघत आहोत की इतिहासाची पुनरावृत्ती केली जात आहे, यावेळी इतिहासाचे विडंबन केले जात आहे.

जेव्हा पुतिन पहिल्यांदा सत्तेवर आले होते तेव्हा अमेरिकने त्यांच्याबरोबर सुरळीत संबंध ठेवले होते, पण जेव्हा त्यांचे व्यवहार अधिकाधिक रशियाच्या हिताचे होत गेले तेव्हा आर्थिकदृष्ट्या नफेखोरी करणार्यांना व युरोप-आशियातील फोसिल संसाधनांचा कब्जा असणार्यांना पुतिन धोकादायक वाटू लागला. ओसाम बिन लादेनच्या निधनानंतर मुस्लीम धोक्याला विशेषत: अधिक बळकटी देण्यासाठी अमेरिकेतील शस्त्रास्त्र- निर्मिती करणार्यांना एका नवीन शत्रूची गरज होती. म्हणून पुतिनची खोटी प्रतिमा संपर्क माध्यमांत जगातील संरक्षण व्यवस्थेला मोठा धोका अशा अर्थाने निर्माण करण्यात आली. प्रत्यक्षात अमेरिकन धोरणांमुळे जगात तणाव निर्माण केले जात आहेत.

पुतिनची राक्षसी प्रतिमा उभी करण्यासाठी व संपर्क माध्यमांद्वारे अमेरिकेतील धनाढ्य व उच्चभ्रू लोकांच्या हितासाठी अनुकूल लोकमत निर्माण करण्यासाठी पुतिन यांची दुष्ट प्रतिमा निर्माण केली जात आहे. अशी प्रतिमा उभारण्यामागे खोटी नैतिक घबराहट निर्माण करणे हा उद्देश आहे हे समजून घेतले तर आपण या कटाचे भक्ष्य होणे टाळू शकतो व धनाढ्यांच्या बेफाम धोरणांना विरोध करू शकतो. आपण कुठल्याही बाबीची खोल समिक्षा करण्यास व अधिकाधिक स्वतंत्रपणे विचार करण्यास शिकले पाहिजे व शांततेसाठी कार्यरत झाले पाहिजे.

ऑक्युपाय वॉल स्ट्रीट, डेमोव्रँसी स्प्रिंग व अन्य चळवळींमधून  आपण समजू शकलो की सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारांतील धनाढ्यांच्या प्राथमिकता व सर्वसाधारण जनतेच्या प्राथमिकता समान नाहीत. लोभी व वैचारिक द़ृष्ट्या गुलाम असलेल्या राज्यकर्त्यांना महाकाय उद्योगांच्या नफेखोरीसाठी व अमेरिकन प्रभृत्वासाठी खुले बाजार, जगातील संसाधनांची मालकी व नियंत्रण आणि लष्करी क्षेत्रात शिरकाव या सर्वांची आवश्यकता आहे. मात्र सर्वसाधारण जनतेला शांतता, सुरक्षितता, पर्यावरणपूरक उत्पादन व्यवस्था व सर्वांना रोजगार या सर्वांची आवश्यकता आहे.

रशियाचे खलनायकीकरण केल्यामुळे उच्चभ्रू वर्गाला देशातील  प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवता येते. तसेच परकीय देशाला शत्रुस्थानी बसवून लष्करावरील खर्चात वाढ करता येते व परराष्ट्रावर युद्धेही लादता येतात. शीतयुद्धाचा इतिहास आपल्याला शिकवतो की लष्कराच्या जोरावर जगावर राज्य करणे किती भयंकर हानीकारक आहे. या पुस्तकात जी मांडणी करण्यात आली आहे त्यावरून शांतता व सुरक्षितता धोक्यात आणणार्या कारवायांना विरोध करणे किती अत्यावश्यक आहे   हे लक्षात येते. आपण जनतेला व विशेषत: तरुणांना स्वत:चे हित संभाळणारी पर्यायी विकसनीति निर्माण करण्याचे शिक्षण दिले पाहिजे.https://saptahikyugantar.blogspot.com/ 

1795 मध्ये जेम्स मँडिसन यांनी लिहीले आहे की : जनतेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात  मोठा भीतिदायक घटक युद्ध आहे, कारण अन्य हानिकारक घटकांचा उदय या युद्धात होत असतो. युद्धातसत्ताधार्यांच्या विशेष अधिकारांत वाढ होत असते व त्यांना जनतेच्या ताकदीवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व भ्रष्ट मार्गाचा वापर करणे शक्य होते. कुठल्याही युद्धग्रस्त देशांत स्वातत्र्य सुरक्षित असत नाही.’

शीतयुद्धाच्या काळात व दहशतवादाच्या विरुद्ध युद्धाच्या काळात अमेरिकेच्या राजकारणावर व एकूण जनतेवर भ्रष्ट व भयावह जे परिणाम झाले आहेत त्यांच्या संदर्भात जेम्स मँडिसनची वरील मांडणी किती योग्य आहे हे समजते. आमची आशा आहे की व्हिएतनाम युद्धाच्या विरोधी ज्याप्रमाणे चळवळ उभी राहिली होती. त्याचप्रमाणे आता शांतता व न्यायासाठी लोकांची चळवळ विकसित होईल व अमेरिकेच्या परकीय राष्ट्रांबाबत असणार्या धोरणांत काहीतरी शहाणपण येईल. पहिल्या शीतयुद्धात माणुसकीची जी हानी झाली त्यापेक्षा खूप जास्त हानी होऊ शकणारे दुसरे शीतयुद्ध थांबविण्यासाठी आपण जे जे शक्य आहे ते केले पाहिजे.
लेखन : नचिकेत कुलकर्णी
स्वैर अनुवाद : शिरीष मेढी

Post a Comment

Previous Post Next Post