आर.एस.एस.च्या कार्यक्रमातील प्रणवदांचा संधीसाधू सहभाग


प्रणव मुखर्जी हे बुद्धीवान व देशात मान्यता असलेले राजकीय नेते आहेत. आपल्या लोकशाहीवादी देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत ते पोहचले. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी पक्ष बदलले असतीलही, त्याकडे दुर्लक्ष करूयात. एकदा ते देशाचे राष्ट्रपती झाल्यावर व त्या पदावरून निवृत्त झाल्यावर त्याची शान त्यांनी जोपासायला पाहिजे. आर.एस.एस.चे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. विविधता असणार्या, बहुलता असणार्या आपल्या देशात त्यांनी आर.एस.एस.च्या मंचावर जाऊन विचार व्यक्त करण्यासंदर्भात दक्षता बाळगावयास हवी होती. त्यांनी तेथे जाऊन चांगले भाषण केलेही असेल; परंतु कोणत्या मंचावरून त्यांनी हे भाषण केले, त्याकडे जनतेचे लक्ष आहे. भूतांच्यासमोर वेद वाचण्यासारखे हे आहे. प्रणवदाना इतिहास माहीत नाही असे कोणीही म्हणू शकत नाही; परंतु आर.एस.एस. स्वयंसेवकांना, मोदीच्या आर्मीवर प्रभाव टाकण्यासाठी, खुश करण्यासाठी हे संधीसाधू कथन होते.

महात्मा गांधींची हत्या करणार्या गोडसेसंदर्भात त्यांनी एकही वाक्य उच्चारले नाही. भाजपचे खासदार, आर.एस.एस.चे नेते देशभर गोडसेंचा उदोउदो करत आहेत, त्याचीउंचीस्थापन करू इच्छित आहेत. या संदर्भात प्रणव मुखर्जी फार दक्ष होते. आर.एस.एस. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गोडसे त्यासंदर्भात एकही वाक्य उच्चारले जाणार नाही; याची ते काळजी घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे त्यांनी गुणगाण केले, त्यांना थोर देशभक्त म्हटले! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्याचे प्रमुख स्वातंत्र्य लढ्यात कधीही नव्हते हे येथे सांगणे अप्रस्तुत ठरणार नाही. उलट मुस्लिम, ख्रिश्चन समुदाय हे देशाचे शत्रू असल्याचे हेडगेवार म्हणत होते, इंग्रज हे देशाचे शत्रू असल्याचे मात्र हेडगेवारांनी कधी म्हटले नाही. अगदी आजही साम्राज्यवादाच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनात फरक पडलेला नाही. त्यांच्यामध्ये नक्कीच एक बदल झालेला दिसतोय. पूर्वी ते अर्धी चड्डी घालायचे, आता पूर्ण विजार परिधान करू लागले आहेत. ते स्वत:ला आता प्रौढ झालेली मुले असे समजू लागले आहेत. हाच एकमेव बदल त्यांच्यात दिसू लागलाय, विचार मात्र तेच आहेतhttps://saptahikyugantar.blogspot.com/ 

गेल्या 4 वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या संघ नियंत्रित भाजप सरकारच्या काळात लेखक, बुद्धीवंत, पत्रकार व पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी सारखे कम्युनिस्ट नेते व सामाजिक कार्यकर्तेही मारले गेले. जर्मनीमध्ये नाझी हिटलरने जे कृत्य केले तसेच कृत्य भारतातील सरकार करीत आहे. गोरक्षेच्या नावाने बीफचा व बीफ खाणार्यांच्या बाबतीत असभ्यपणा दाखवला जात आहे. पण हे वास्तव नाही का की भाजपशासीत गुजरात राज्यातून सर्वात जास्त बीफची निर्यात होतेय? मनमोहनसिंग व प्रणवदांच्या काळात मधु कोडा, . राजा व कनीमोळी सारख्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते; पण या सरकारच्या काळात काय घडत आहे? हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणार्या व सर्वात जास्त भ्रष्टाचार करणार्या व्यक्तींना देशाच्या सीमा सहजपणे ओलांडून बाहेर जाणे शक्य झाले. भाजप सरकारच्या पाठिंब्यामुळेच त्यांना हे शक्य झाले. पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांना फसवणार्या व हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर 31 जानेवारी 2018 रोजी देशातून पलायन केलेला नीरव मोदी पंतप्रधान व इतर महत्त्वाच्या नेत्यांसोबत छायाचित्रात कसा काय दिसतो? स्वित्झर्लंडमधील दाओस येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरलेल्या जागतिक आर्थिक बैठकी दरम्यान नीरव मोदीचे फोटो मोदी बरोबर कसे झळकतात? भारताचा पासपोर्ट असताना नीरव मोदीला लंडनहून दुसर्या देशात जाण्याची परवानगी कशी मिळते? विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी आदी कर्जबुडव्यांच्या संदर्भात एका शब्दानेही ‘‘प्रणव दादा’’नी आपल्या भाषणात का उल्लेख केला नाही? हा निखालस संधीसाधूपणा नाही? केंद्र सरकारच्या व देशाच्या सर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवहारात, निर्णयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेंदू कार्यरत आहे. प्रणव मुखर्जीच्या काळातील परराष्ट्रीय धोरणांना आज 100% उलटे फिरवण्यात आले आहे. उलटा प्रवास सुरू आहे. प्रणव मुखर्जी मात्र स्पष्टपणे या बाबतीत शांत राहतात! आपल्या भाषणात ते याचा उल्लेखही करीत नाहीत. संघ कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणेच ना राष्ट्रीय झेंड्यास वंदन केले ना राष्ट्रगीत म्हटले!

उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सर्व देश पादाक्रांत करण्याची व एकानंतर एक राज्यं जिंकत जाणार असल्याची गर्जना कर्नाटक निवडणूकांपूर्वी त्यांनी केली. ते हे विसरतात की संपूर्ण देशात त्यांनी फक्त 32% मते प्राप्त केली आहेत. भाजपची प्रतिमा मलीन होत चालली आहे हेही वास्तव आहे. गोरखपूरपासून त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या 11 विधानसभा व 4 लोकसभा मतदार संघांतील पोटनिवडणूकामध्ये केवळ 1 विधानसभेची व 1 लोकसभेची जागा ते जिंकू शकले. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत जिंकण्याच्या त्यांच्या आशावादाला सलाम! राज्यपालांच्या मदतीने त्यांनी कर्नाटकात केलेला तमाशा आपण पाहिला; परंतु लोकशाहीचे संरक्षण करणार्या सर्वोच्च न्यायालयाचे आभारhttps://saptahikyugantar.blogspot.com/

अशा दयनीत अवस्थेमुळे त्यांनी शिवसेनेसारख्या मित्रपक्षाला विनंती करणे सुरू केले आहे. सिनेअभिनेत्री माधुरी दिक्षितना भेटण्यापर्यंत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी मजल मारली! प्रणव मुखर्जींच्या भाषणाने त्यांचे काही चाहते प्रभावित झाले असतील; परंतु जर आपण सखोल अभ्यास केला तर असे लक्षात येईल की प्रणव मुखर्जींचे भाषण आशयहीन तर होतेच ते उपद्रवीही ठरले. या भाषणाचा देशाला काहीही उपयोग नाही. भाजप त्याच्या फायद्यासाठी प्रणव मुखर्जीचा वापर करीत आहे. परंतु प्रणवदादेखील तशीच अपेक्षा करीत असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रण स्विकारण्याची कल्पना ही संधीसाधुपणाची होतीच. मूर्खांना आपण प्रभावीत करू शकू असेही प्रणवदाना वाटत होते. माजी राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण स्वीकारण्यास भाग पाडून भाजपला फायदा झालाही असेल; परंतु प्रणवदांच्या जीवनावर, राजकीय कारकिर्दीवर निश्चितपणे काळा डाग पडला आहे.

- डॉ. के. नारायणा
राष्ट्रीय नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
(अनुवाद : प्रा. डॉ. राम बाहेती)

Post a Comment

Previous Post Next Post