कन्हैयाकुमार : डाव्या, परिवर्तनवादी राजकारणाची नवी उमेद!

परिस्थितीने जन्मास घातलेले नेतृत्व म्हणून कन्हैया कुमारच्या हुशारी, वक्तृत्व व आकलनावर पडदा ाकणे अवघडच. समाजवादी वैचारिक मुशीत वाढलेला कन्हैया सध्या तिशीत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी दखल घ्यावी, इतपत त्यामध्ये आहे तरी काय, या प्रश्नाचे उत्तर सोमवारी ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष त्याला ऐकले त्या शहरवासीयांना नक्कीच मिळाले असणार.

देशाच्या राजकीय क्षितिजावर मोदी-शहा जोडगोळीने घडविलेला करिष्मा हा आता करिष्मा न राहता देशाचे प्राक्तन होणार, असे पद्धतशीररीत्या जनमनावर बिंबविले जात आहे; परंतु कन्हैया हा तरणाबांड नेता मात्र मोदी पर्वच कसे आभासाआहे, सत्य व वास्तवाला काहीच जागा नाही, हे चपखलपणे पवूनदेत देशाचे वास्तवही प्रखरपणे मांडतो. तो म्हणतो माझे वय अभ्यासाचे; परंतु तुम्ही देशभरातील हजारो दीनदलित, अल्पसंख्याक व ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करता. कारण आम्ही शिकूच नये; हीच तुमची भूमिका. त्याविरुद्ध आम्ही रस्त्यावर आलो तर तुम्ही थे विद्यापीठांना बदनाम करण्याचा डाव मांडला. प्रारंभी हैदराबाद, तामिळनाडू, पुण्याचे एफएफआयी नंतर जे.एन. यू. यांना तुम्ही देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न केला. ही विद्यापीठे देशद्रोही असतील तर बॉम्ब ाकून त्यांना उडवूनच द्या ना, असा अंगार तो ओकतो. मला राजकारणात तुम्ही ओढले आहेच, तर आता या. माझ्याशी वैचारिक वाद घाला. चला नीतीवर बोलू, धोरणावर चर्चा करू; परंतु नीती, धोरणावर हे बोलणार नाहीत, असे सांगून कन्हैयाने सरकारच्या एकूणच तीन वर्षांच्या कामकाजाची केलेली चिरफाड ऐकावी अशीच आहे. मोदींच्या निवडणूकपूर्व मोठमोठ्या आश्वासनांची पोलखोलही तो लीलया करतो. पीएम मोदी व सीएम मोदींच्या वर्तनातील त्याने मांडलेला फरक देशभरातील मान्यवर विरोधी नेत्यांना का विशद करता येऊ नये, असा प्रश्नही मग सहज पडतो...

शहरात झालेल्या दोन्ही कार्यक्रमांत कन्हैयाचा भर सरकारची कृती व वैचारिक भूमिकेवर प्रकाश ाकण्याचाच होता. भाजप, मोदींना झोडपतानाच त्याने त्यांची विचारभूमी आर. एस. एस. वरही हल्ले चढविले. तो म्हणतो, ‘संघाचा भगवा झेंडा व सर्वसामान्यांचा भगवा झेंडा यात खूप अंतर आहे. हे अंतर सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ नये यासाठी संघाचा आापिा सुरू आहे.’ ‘मी राष्ट्रभक्त नाहीच. मी देशप्रेमी आहेअसे सांगून उभारणे, संविधान वाचविण्यासाठी झणे, हेच खरे राष्ट्रप्रेम व तोच खरा राष्ट्रप्रेमी आहे.’ यादृष्टीने पाहिल्यास विद्यमान सरकार व विचारसरणी हीच देशद्रोही ठरते. त्याचा प्रत्येक शब्द समोरची लहान-थोर मंडळी कानात प्राण आणून ऐकत होती. उत्स्फूर्त प्रतिसादही देत होती. कन्हैयाचे वाचन, आकलन, समस्यांची जाणीव आणि वक्तृत्वही प्रभावशाली असल्याने त्याने शहरवासीयांवर मोहिनीच घातली.


कन्हैया कुमारच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद बिहार ते तिहारचे प्रकाशन व संविधान बचाव परिषदअशा दोन कार्यक्रमांना त्याने हजेरी लावली. दोन्ही कार्यक्रमांना युवकांसह सर्वच वयोगांतील कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी होती. त्यातील प्रकाशन समारंभ तर फक्त निमंत्रितांसाठीच होता; परंतु तेथेही तोबा गर्दी झाली होती. सभागृहात जाण्यासाठी अनेक जण पोलिसांसोबत भांडले. मुख्यमंत्र्यांच्या सभेला द्यावा, त्या धर्तीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एका विद्यार्थी नेत्याच्या कार्यक्रमाचा मोठाच धसका प्रशासनाने घेतलेला दिसला. एक तर हा कार्यक्रमच होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. कार्यक्रम थांबविणे अशक्य झाल्याने कार्यक्रम स्थळांना पोलीस छावण्यांचे रूप दिले. श्वास गुदमरवणार्या या वातावरणाचे दडपण कन्हैया स्वत:वर येऊ देत नाही. आपण आता समाजाचे, देशाचे झालो आहोत. मी माझ्या घरच्यांचा राहिलोच नाही, असे सांगत हा तरणाबांड नेता आता सेव्ह इंडिया-चेंज इंडियाचा नारा देत, देशभ्रमंतीवर निघाला आहे.

- शांतीलाल गायकवाड

Post a Comment

Previous Post Next Post