गोरखपूर येथील 79 मुलांचा मृत्यू : भाजप शासनाचेच पाप!

गोरखपूर येथील सरकारी रुग्णालयात प्राणवायूच्या अभावामुळे 79 मुलांचा मृत्यू झाला! प्राणवायू पुरवणार्या कंपनीला वारंवार मागणी करूनही 68 लाख रुपयांची थकबाकी न मिळाल्यामुळे हा अत्यंत संतापजनक प्रकार घडल्याचे वृत्तपत्राद्वारे सांगण्यात येत आहे. परंतु या घनेची न्यायालयीन चौकशी न करता त्यावर पांघरून घालण्याचेच काम भाजप शासनामार्फत होत आहे.

योगी आदित्यनाथ, आरोग्यमंत्री सिंग व भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा व इतर प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत संवेदनाहीन व जबाबदारी झकणार्या आहेत. . बंगालमध्ये काही वर्षांपूर्वी मुलांचा इस्पितळात मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राजीनामा मागण्यात हेच भाजप नेते आघाडीवर होते.
आता मात्र प्राणवायूच्या कमतरतेमुळे नव्हे तर मेंदूच्या आजारामुळे व वैद्यकीय अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी यांनी तर दरवर्षीच असे मृत्यू घडतात असे विधान केले तर त्यांचे नेते अमित शहा यांनी एवढ्या मोठ्या देशात असे होणारच असे सांगून आपली बेदरकार वृत्तीच दाखवली आहे.

खरे पाहता जगातील सर्वात जास्त खाजगीकरण असलेली भारताची आरोग्य व्यवस्था सर्वसामान्य माणासाच्या आवाक्याबाहेर आहे व याचा ताण सरकारी आरोग्य सेवेवर पडत असताना आरोग्य सेवेेच्या खर्चावर कपात केली जात आहे. खरे पाहता या मुलांचा मृत्यू म्हणजे आरोग्य सेवेसाठी धोक्याचा इशाराच आहे व कृतिशील कार्यकर्त्यांसाठी कृती करण्याचा. योगेंद्र यादव यांनी आरोग्य सेवेच्या संदर्भात जोपर्यंत आरोग्यसेवा सुधारण्याची मागणी राजकारणात महत्त्वाची होत नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही असे मत मांडले आहे. या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्याचे केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत व त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

परंतु या घनेचे विरोधक राजकारण करीत आहेत असे म्हणून राजकारण करणारे भाजपचे नेते मुलांच्या मृत्यूसंदर्भात खंतही प्रक करीत नाहीत. जनतेच्या भावना तीव्र आहेत हे ध्यानात ठेवून पंतप्रधान मोदी यांना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या घनेचा उल्लेख करावा लागला. परंतु बुंद से गई वो हौद से नहीं आतीहेच खरे. भाजपचे प्रवक्ते अत्यंत उद्धपणे वाहिन्यांवर या घनेच्या संदर्भात वक्तव्ये करून जनतेला भ्रमित करीत आहेत व त्यांचे अध्यक्ष असे घडतेच म्हणून समर्थन करीत आहेत. जनतेनेच याचा जाब विचारला पाहिजे.

कॉ. डॉ. भालचंद्र कानगो

Post a Comment

Previous Post Next Post