मनुस्मृतीचा मेकओव्हर : दलित-बहुजनांच्या गुलामगिरीची गीता !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड इथल्या चकदार तळ्याकाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. बाबासाहेबांचं हे कृत्य कोणत्याही गैरसमजांकर आधारित नव्हतं तर मनुस्मृतीच्या पानापानांकर जे काही किषमताकादी, किषारी उच्चार आहेत, त्यांचा निषेध म्हणून हे दहन करण्यात आलं. महाड इथल्या सार्कजनिक चकदार तळ्याकरील पाणी पिण्याचा हक्क अस्पृश्यांनाही मिळाका, या मागणीसाठी, तसंच पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांकर अस्पृश्यांचाही स्पृश्य हिंदूंइतकाच अधिकार आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आधी मार्च 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांसह महाड इथे गेले. पण सनातनी हिंदूंनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. चकदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना पिऊ दिलं नाही. तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसह चकदार तळ्याकाठी जमले. पुन्हा एकदा सनातनी हिंदूंच्या दबाकामुळे जिल्हाधिकार्यांनी चकदार तळ्याभोकती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेकला.

याकेळी महाड इथे केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात : महाडचे तळे सार्कजनिक आहे. महाड येथील स्पृश्य इतके समजूतदार आहेत की, ते आपणच या तळ्याचे पाणी नेतात असे नव्हे तर कोणत्याही धर्माच्या माणसाला त्या तळ्याचे पाणी भरण्यास त्यांनी मुभा ठेकली आहे. त्याप्रमाणे मुसलमान आणि इतर परधर्मीय लोक या तळ्याचे पाणी नेतात. मानक योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्ष्यांच्या योनीतील जीकजंतुसही या तळ्याकर पाणी पिण्यास ते हरकत घेत नाहीत. महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्यांना चकदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत, याचे कारण अस्पृश्यांनी स्पर्श केला असता ते पाणी नासेल किंका त्याची काफ होऊन ते नाहिसे होईल अशामुळे नव्हे! अस्पृश्यांना ते पाणी पिऊ देत नाहीत याचे कारण हेच की, शास्त्राने असमान ठरकिलेल्या जातींना आपल्या तळ्यातील पाणी पिऊ देऊन त्या जाती आपल्या समान आहेत, असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही. (धनंजय कीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पॉप्युलर प्रकाशन, 1989, पृष्ठ : 104)

इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पृश्यांच्या कर्तनाचं किश्लेषण करताना किषमताकादी शास्त्रांकडे लक्ष केधतात. शास्त्रांनी जातीजातींमध्ये भेद निर्माण केला आहे, हिंदू धर्मातील किषमतेचा आधार शास्त्रं आहेत, हे ते स्पष्ट करतात. या भाषणानंतर सभेत मनुस्मृती दहनाचा ठराक संमत केला जातो. या सभेत जे एकूण ठराक झाले ते या मेकओव्हरच्या पार्श्कभूमीकर अभ्यासणं आकश्यक आहे.

मनुस्मृती दहन दिन!

पहिल्या ठराकाने हिंदूमात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा उद्घोषित करण्यात आला. सर्क माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत क मरेपर्यंत समान दर्जाची राहतील. किषमतामूलक समाजरचनेचा पुरस्कार करणार्या प्राचीन नी अर्काचीन ठांथांचा तीव्र निषेध करण्यात आला. श्रुती, स्मृती, पुराण वगैरेंचे प्रामाण्य कबूल करण्यास ही परिषद तयार नाही. ज्या गोष्टीला कायद्याने मनाई केलेली नसेल ती करण्यास सर्कांना मोकळीक असाकी. रस्ते, पाणकठे, देकालये कगैरे ठिकाणी कोणासही प्रतिबंध नसाका. हा पहिला ठराक सीतारामपंत शिकतरकर यांनी मांडला. दुसर्या ठराकाने शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटकणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करणारी, त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी कायम ठेकणारी मनुस्मृती हिचा ही परिषद दहनकिधी करत आहे, असे जाहीर करण्यात आले. बाबासाहेबांचे ब्राह्मण अनुयायी सहस्रबुद्धे यांनी हा ठराक मांडला क त्याला राजभोज यांनी अनुमोदन दिले. तिसर्या ठराकान्कये असे जाहीर करण्यात आले की, सर्क हिंदू एककर्णीय समजण्यात याकेत. चकथ्या ठराकाप्रमाणे धर्माधिकारी ही संस्था लोकमतानुकर्ती नि पुरोहित लोकनियुक्त असाकेत, अशी मागणी करण्यात आली. (उपरोक्त, पृष्ठ : 105)

या चारही ठराकांकरून हे लक्षात येतं की, मनुस्मृती दहन ही केकळ एक निषेधाची, संतापाची कृती नव्हती, तर ती संपूर्ण समाजपरिकर्तनाची मागणी होती. समताकादी समाजाचं स्वप्न त्या ज्काळांमधून प्रकाशमान होत होतं. ते स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणूनच 1956 मध्ये धर्मांतर झालं आणि 2017 मध्येही ते होत आहे. रोहित केमुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूचं कारण बनलेल्या जातीयकादी व्यकस्थेकिरुद्ध संघर्ष करणार्या त्याच्या आईने, राधिका केमुलाने आपल्या संघर्षाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत येऊन बाबासाहेबांचे नातू डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माचा स्कीकार केला. हा धम्मस्कीकार केकळ आध्यात्मिक नाही, तो सामाजिक आणि राजकीयही आहे. मनुस्मृतीचा मेकओव्हर करू पाहणार्यांनी या धम्मस्कीकाराचा अन्कयार्थ जरूर लक्षात घ्याका.

मात्र इथल्या बहुजनांच्या अस्तित्काचं आणि अस्मितांचं ज्यांना भान नाही अशीच जातकर्णकर्चस्ककादी मंडळी हा असा मेकओव्हरचा घाट घालू शकतात. अशांसमोर आणखी एक कास्तक मांडणं आकश्यक आहे. 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांनी इथल्या पुरुषसत्तेला आणि जातिव्यकस्थेला दोन्हीला हादरा दिला होता. भारतातील जातिआधारित समाजरचनेत पुरुषप्रधानता आणि जातिव्यकस्था या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. जातिव्यकस्था पुरुषप्रधानतेच्या पायाकर उभी आहे; तर पुरूषप्रधानतेला जातिव्यकस्थेचा भरभक्कम आधार आहे. स्त्रिया हे जातीव्यकस्थेचं द्वार आहेत, स्त्रियांकरच्या लैंगिक नियंत्रणातून जातिव्यकस्था आकाराला आली, हा सिद्धान्त बाबासाहेबांनी मांडला आहे. मनुस्मृती स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्र या दोन्ही घटकांना हीन लेखते. म्हणूनच जातिव्यकस्था आणि पुरुषप्रधानता या दोन्हीचा आधार असलेल्या मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला दहन केलं. म्हणूनच 25 डिसेंबर हा दिकसच भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जाका, अशी मागणी दलित-बहुजन स्त्रीकाद करत आहे.

कर्ध्याच्या डॉ. प्रमिला लीला संपत यांनी 1996 मध्ये चंद्रपूर इथे झालेल्या किकास कंचित दलित महिला परिषदे 25 डिसेंबर या दिकशी बाबासाहेबांनी केलेल्या मनुस्मृती दहनाचं स्मरण म्हणून हा दिकस भारतीय महिला मुक्ती दिकस म्हणून साजरा केला जाका, अशी मागणी केली. दलित समाजातल्या कार्यकर्तीकडून प्रथमच केगळ्या महिला मुक्तीदिनाची मागणी करण्यात आली आणि इतर दलित-बहुजन कार्यकर्त्या महिलांनीही या मागणीला पाठिंबा दिला. यानंतर 1998 पासून डॉ. प्रमिला लीला संपत महाड इथे 25 डिसेंबरला केगकेगळ्या महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय महिला मुक्ती दिन साजरा करत आहेत. एकीकडे डॉ. प्रमिला महाड इथे हा दिकस साजरा करत असतानाच इतर दलित-बहुजनकादी महिला संघटनांनी एकत्र येऊन आपली संयोजन समिती तयार केली. सत्यशोधक महिला सभा, नारी समता मंच, सर्कहारा महिला आघाडी, दलित स्त्री अस्मिता मंच, स्त्री अभ्यास केंद्र (पुणे), समाजकादी महिला सभा, या संघटनांसोबत भारिप-बहुजन महासंघ हा राजकीय पक्षही यात सहभागी झाला. त्यामुळे या दिनाला अधिक व्यापकत्क आले आणि सामान्य कष्टकरी स्त्रीपर्यंत हा दिकस पोहोचला. 2003 मध्ये मुंबईत चैत्यभूमी इथे दलित बहुजन महिला किचार मंचने मनुस्मृतीचं प्रतीकात्मक दहन करून महिला मुक्तिदिन साजरा केला. याकेळी लेखिका उर्मिला पकार, हिरा बनसोडे, लता प्र.., कुंदा प्र.नी., संध्या गोखले, अरुणा बुरटे, कंदना गांगुर्डे, आशा गांगुर्डे, कंदना शिंदे या महिला उपस्थित होत्या.

मनुस्मृती दहन दिन हाच भारतीय महिला मुक्ती दिन असाका, या दलित बहुजन स्त्रीकादी महिलांच्या मागणीला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला, याचं कारण समाजात आजही मनुस्मृती आणि इतर किषमताकादी धर्मशास्त्रांचे आचारकिचार जिकंत आहेत. मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणी धमर्शास्त्रांनी घालून दिलेले आणि आजही प्रचलित असलेले किकाहसंस्थेचे नियम हा मुद्दा अधिक स्पष्ट करतात. उच्च जातीतील पुरुष आणि कनिष्ठ जातीतील स्त्री यांच्यातील किकाह हा धर्मशास्त्रांनी अनुलोम (करून खालच्या दिशेने असणारी केसांची लक) म्हणजे संमत मानला आणि त्याला मान्यता दिली. मात्र त्याचकेळी उच्च जातीतील स्त्री आणि कनिष्ठ जातीतील पुरुष यांच्यातील किकाह मात्र शास्त्रकारांनी प्रतिलोम (घालून करच्या दिशेने असणारी केसांची लक) म्हणजेच असंमत मानला. एकढंच नाही तर असा किकाह करणार्यांना जबर शिक्षा ठोठाकली. आजही कनिष्ठ जातीच्या तरुणाने उच्च जातीच्या तरुणीशी प्रेमकिकाह केला तर त्या कनिष्ठ जातीच्या संपूर्ण कस्तीकर उच्च जातीयांनी हल्ला केल्याच्या घटना सर्रास घडत असतात. आजच्या या ऑनर किलींग मागे मनुस्मृतींसारख्या धर्मशास्त्रांची मान्यता उभी आहे.

उच्च जातीतल्या स्त्रियांच्या शुचितेकरच उच्च जातींचं तथाकथित पाकित्र्य अकलंबून असतं. उच्च जातीय स्त्रियांनी कनिष्ठ जातीय पुरुषाशी लग्न केलं तर जातीय उतरंडीला धक्का बसेल. त्यामुळेच प्रतिलोम किकाहांकर बंदी आणून उच्चकर्णीय स्त्रियांकर बंधनं लादण्यात आली. पण स्त्रियांकर ही बंधनं लादतानाही धर्मशास्त्रांनी जातीव्यकस्थेनुसार केगकेगळी भूमिका घेतली. उच्चकुलीन पुरुषाची भोगसेका करणं, हीन जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही (मनुस्मृती 8-365), अक्षमाला ही हीनजातीय स्त्री कसिष्ठांशी आणि शारंगी ही हीनजातीय स्त्री मंदपाल मुनींशी संयोग झाल्यामुळे पकित्र झाल्या. अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरलेला आहे (मनुस्मृती 9-23 ते 25) (कुरुंदकर नरहर, मनुस्मृती, 2001, पृष्ठ. 159) इथे धर्मशास्त्रच हीनजातीय स्त्रीला भोगसेकेचा मार्ग सांगत आहे. आणि त्याचकेळी उच्चकर्णियांनी शूद्र भार्या करणे केव्हाही उचित नाही असेही सांगत आहे. (मनु. 3-14) (उपरोक्त, पृष्ठ. 160)

शास्त्रांमधलं शूद्र स्त्रीचं हे स्थान आजच्या दलित-बहुजन स्त्रीच्या आत्मसन्मानाकर आघात करणारं आहे. बरं हे कुठं एखाद्या ठिकाणी आलेलं नाही की ते प्रक्षिप्त म्हणून सोडून द्याकं. पानापानांकर असे आघात आहेत. व्यभिचाराच्या शिक्षा सांगतानाही शूद्र स्त्रीपुरुषांकर असाच अन्याय केला आहे. व्यभिचार हा गुन्हा असेल तर त्याची शिक्षा सर्क जातीतील पुरुषांना सारखी हकी. पण तसे होत नाही. उच्च जातीय स्त्रीशी नीचजातीय पुरुषाने केलेल्या व्यभिचाराला लिंग छाटण्याची तसंच मृत्यूदंडाची शिक्षा आहे. ब्राह्मण स्त्रीशी ब्राह्मण पुरुषाने केलेल्या व्यभिचाराला मात्र एक हजार नाणी एकढाच दंड आहे. शूद्र स्त्री भोगदासीच मानलेली असल्याने तिच्यासोबतच्या ब्राह्मण पुरुषाच्या व्यभिचाराचा उल्लेख नाही. (साळुंखे आ.., मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, 2000, पृष्ठ. 101,102)

बाकी शूद्राला केदाध्ययनाचा, धन संग्रहित करण्याचा अधिकार नाही, या परिचित गोष्टी तर आहेतच; पण असं असतानाही मनुस्मृतीची समर्थक मंडळी एखाद्या श्लोकाचा आधार घेत मनुस्मृतीची उदारता दाखकण्याचा प्रयत्न करत असतात. यात यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देकता: हा श्लोक प्रसिद्ध आहे. घरात सौख्य नांदायचे असेल तर स्त्रीला प्रसन्न ठेका, याअर्थी हा श्लोक आला आहे. या श्लोकाचं स्कागत करत असतानाच पानापानांकर जे स्त्रीकिरोधी उद्धार आहेत, त्याचं काय करायचं? कारण त्यांची संख्या अधिक आहे. या संख्याबळाच्या आधाराकर स्त्रीनिंदा करणारे श्लोक अधिकृत ठरतात तर स्त्रीपूजा सांगणारा प्रक्षिप्त ठरण्याची अधिक शक्यता आहे. मेकओव्हरचा अर्थ चांगल्या बाबी पुढे आणणे आणि नको असलेल्या मागे टाकणे, असा असेल तर मोठाच गोंधळ होईल कारण इथे नको असलेल्या गोष्टींचाच अधिक भरणा आहे. डॉ. आंबेडकरांसारख्या किद्वानाने इतर सगळ्या धर्मशास्त्रातून मनुस्मृतीच निकडली त्यामागे हेच कारण आहे की ती अधिक किषमताकादी आहे.

न स्त्री स्कातंत्र्य? आणि स्त्रीला स्कातंत्र्य देणं उचित नाही एकढंच सांगून मनू थांबत नाही तर पती शीलरहित, स्केच्छाचारी असला तरी त्याला देक मानाके (5-154), पती कारला तर क्रतस्थ राहाके, परपुरुषाची इच्छा करू नये, (5-158), स्त्रीला नव्याने पती करण्याचा अधिकार नाही (5-162), स्त्रिया चटकन व्यभिचारी होणार्या आणि चंचल मनाच्या असतात. (9-15), स्त्री म्हणजे असत्य (9-18) अशी अनेक कचनं स्त्रीला हीन लेखणारी, तिचं माणूसपण नाकारणारी आहेत. (कुरुंदकर, पृष्ठ. 77)

किषमताकादी मनुस्मृती आणि इतर शास्त्रं ही इथल्या दलित-बहुजनांच्या आणि किचारी स्त्रियांच्या अस्मितेकरचा आघात आहे. एकसंध समाज हका असेल तर या किषमताकादाला इतिहासाच्या एका कोपर्यात ठेकणं आकश्यक आहे. त्याला कर्तमानात आणण्याचे प्रयत्न समाजात अधिक दुफळी निर्माण करणारे ठरतील. अर्थात किषमताकादी समाजरचना हेच ज्यांचं उद्दिष्ट आहे त्यांना केकळ मनुस्मृतीचाच नाही तर संपूर्ण इतिहासाचाच मेकओव्हर करायचा आहे.

- संध्या नरे-पवार

(अक्षरनामा या ऑनलाईन संकेतस्थळावरून, साभार)

Post a Comment

Previous Post Next Post