प्रकाश जावडेकर म्हणतात, शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे साहाय्य
मागावे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री अगदी बरोबर बोललेत...!
या सरकारच्या दारात अगोदरच विजय मल्ल्या, नीरव
मोदीसारखे जागतिक किर्तीचे भिकारी कटोरे घेऊन उभे आहेत. यांचे
मंत्री असे भिकारी देशाबाहेर पळून जाण्याआधी त्यांच्या गुपचुप भेटीगाठी घेत आहेत.
शेवटी काय मोदी सरकारच्या प्रायॉरिटीज ठरलेल्या आहेत. त्यात सरकारी शाळा मेल्या तरी चालतील. नव्हे...
त्या मरायलाच हव्यात...! या देशात फक्त अदानी,
अंबानी आणि बाबा रामदेव जगले पाहिजेत. बाकीचे मेले
तरी प्रधानसेवकाला काडीचाही फरक पडत नाही. चाणक्य म्हणाले होते
की ज्या देशाचा राजा व्यापारी, तिथली प्रजा भिकारी...!
आम्ही स्वखुषीने राज्य करायला ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचा
व्यापारी’ निवडलाय. त्यामुळे आता भिका मागून
मरणे एवढेच आमच्या हातात शिल्लक आहे. सरकारी शाळा मेल्याशिवाय
‘अदानी स्कुल ऑफ नर्सरी’, ‘पतंजली हायस्कुल’
आणि ‘अंबानी स्कुल ऑफ बिझनेस’चे जाळे देशात कसे विणता येणार...? आमच्या प्रधानसेवकांनी
म्हणे अस्तित्वात नसलेल्या ‘जिओ इन्स्टिट़यूट’ला हजारो कोटींचा निधी दिलाय. जर सरकार जिओ इन्स्टिट़यूटला
पोसायला लागले तर मग या भिकारड्या सरकारी शाळांना अनुदान द्यायला सरकारकडे निधी कसा
काय उरणार...? त्यामुळे या सरकारी शाळा लवकरच गतप्राण व्हायला
हव्यात. त्यानंतरच ‘जिओ इन्स्टिटयूट’,
‘अदानी इन्स्टिट्यूट’ आणि ‘पतंजली विद्यापीठ’ असे नवनवीन प्रयोग देशाच्या शिक्षण
क्षेत्रात पाहायला मिळतील.https://saptahikyugantar.blogspot.com/
पहिली ते पदवी पर्यंतच्या
सर्व पाठ्यपुस्तकांच्या कव्हरवर देवाधिदेव नरेंद्रचा फोटो छापला जाईल. त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राष्ट्रपुरुष/राष्ट्रपिता
यांना पाठ्यपुस्तकावर जागा असणार नाही. पहिली ते चौथीला नरेंद्रच्या
बाललीला, त्याची संघातील शिकवण, नरेंद्रने
चहा विकताना केलेले काबाडकष्ट, नरेंद्रने केलेली जनसंघाची स्थापना,
देशभरात जनसंघ वाढवण्यासाठी केलेला त्याग, बाबरी
मशीद पाडून हिंदूंच्या उत्थानासाठी केलेले अमोघ कार्य, त्यानंतर
देशभरात रथयात्रा काढून देशात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आणण्यात नरेंद्रचा असलेला सिंहाचा
वाटा, त्यानंतर संपूर्ण देशाने नरेंद्रला लोहपुरुष अशी पदवी देऊन
केलेला सन्मान, भाजपची सत्ता आणल्यानंतर गुरू वाजपेयींना पंतप्रधानपद
देण्यासाठी नरेंद्रने केलेला त्याग, एकलव्याप्रमाणे प्रसंगी अंगठा
देऊन केलेला गुरूंचा सन्मान अशा गोष्टी शिकवल्या जातील. नंतर
पाचवी ते दहावीला नरेंद्रने गौतम बुद्धाप्रमाणे केलेला पत्नीचा त्याग, हिमालयात जावून घेतलेला संन्यास, त्याकाळात नरेंद्रला
मिळालेले विश्वातील अगाध सर्वज्ञान, जीवनाविषयी साक्षात्कार झाल्यावर
नरेंद्रने संन्यास सोडून पुन्हा राजकारणात परतण्याचा घेतलेला निर्णय, गुजरातचे भूषविलेले मुख्यमंत्रीपद, गोधर्यात दंगल करून जपलेला सर्वधर्मसमभाव, वाळवंटात नंदनवन
फुलवणारा विकासपुरुष, नरेंद्रला तपश्चर्या करून मिळालेली
56 इंची छाती, नरेंद्रचे विविधरंगी कुर्ते,
पांढर्याशुभ्र केसांचा ब्रँड अशा आख्यायिका शिकवण्यात
येतील. अकरावी-बारावीला नरेंद्रने पंतप्रधान
पदापर्यंत मारलेली मजल, रेडिओवरून जनतेशी मन की बात करणारा नरेंद्र,
संसदेत प्रवेश करताना भावूक होत मस्तक टेकवून रडणारा नरेंद्र,
सेल्फीप्रेमी नरेंद्र, मिठीप्रेमी नरेंद्र,
नवाज शरीफला मिठी मारून पाकिस्तानला अद्दल घडवणारा व जगाला गांधीगिरी
शिकवणारा शांतीप्रेमी नरेंद्र, पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारा
पहिला पंतप्रधान, प्रचारसभांमध्ये गर्जणारा नरेंद्र, दिवसाला 24 पैकी 25 तास काम करून
देशासाठी वाहून घेणारा नरेंद्र अशी प्रकरणे अभ्यासली जातील. पदवी
अभ्यासक्रमासाठी मात्र अर्थतज्ज्ञ नरेंद्रची अर्थनीती, कौटिल्य
व नरेंद्रनीतीचा तुलनात्मक अभ्यास, नोटाबंदीची किमया,
काळेधन भारतात आणण्यासाठी नरेंद्रने केलेले भगिरथ प्रयत्न, प्रत्येक नागरिकाच्या जनधन खात्यात 15 लाख रुपये भरून
गरिबी हटावचा दिलेला नारा, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करण्यासाठी
नरेंद्रने दिलेले भरीव योगदान, देशांतर्गत इथेनॉल निर्मिती करून
पेट्रोल-डिझेलचे दर 1 रुपया प्रतिलिटर करण्यासाठी
नरेंद्रने वापरलेली कल्पकता आणि एकंदरीतच जागतिक ख्यातीचे अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक
असलेल्या प्रधानसेवकांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे
जागतिक राजकरणात भारत देश आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येत असल्याने घेतलेल्या प्रगतीचा
आढावा घेण्यात येईल. तेव्हा देशातील सर्वच सरकारी शाळा बंद होऊन
देवाधिदेव नरेंद्र यांच्या महती सांगणार्या शाळा केव्हा उघडल्या
जातील याची आम्ही सर्वचजण आतुरतेने वाट पाहतोय. लवकरच तो सोनियाचा
दिन येवो. ‘जिओ’ जी भर के...!
- अनुपम कांबळी