मुंबईत हुतात्मा कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या लढाऊ आठवणींना मिळाला उजाळा..

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांतर्फे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार हुतात्मा कॉम्रेड कृष्णा देसाई यांना स्मृतिदिनानिमित्त भाकप व जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई येथील हुतात्मा कॉम्रेड कृष्णा देसाई चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.


प्रारंभी लालबाग येथील पक्ष कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड कृष्णा देसाई यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कार्याला आणि गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या लढ्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.


यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. बाबा सावंत, गोविंद कदम, अशोक सूर्यवंशी, मधू कदम, कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई, मुलगा अजित देसाई व शाखेतील कॉम्रेड्स व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post