देशभरातील महिलांनी १ जूनला शोक दिन पाळावा : भारतीय महिला फेडरेशनचे आवाहन


मुं, ता. ३१ : कोरोना महामारी संदर्भात मोदी सरकारच्या धोरणांमुळे अनेक बळी गेले आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. याचे अत्यंत वाईट, दुःखद परिणाम महिला व बालकांवर झाले आहेत. सरकारला याची कोणतीही खंत नाही. म्हणून भारतीय महिला फेडरेशन आणि अन्न अधिकार आंदोलन या दोन्ही संघटनांनी सरकारच्या निषेधार्थ १ जून हा दिवस देशभर शोक दिवस पाळण्याचे ठरविले आहे. या दिवसाच्या निमित्ताने स्थलांतरीत मजुरांच्या मागण्या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करावा, तसेच महाराष्ट्रात हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय, भारतीय महिला फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.

यादिवशी प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या आवारात काळया फिती लावून व हाती मागण्यांचे पोस्टर धरून सरकाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ४ जून रोजी भारतीय महिला फेडरेशनचा वर्धापन दिन असून, यानिमित्ताने रेशन, आरोग्य, रोजगार, हिंसाचार या संदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.

बैठकीला फेडरेशनच्या राज्याध्यक्षा स्मिता पानसरे, राज्य सचिव लता भिसे-सोनावणे, वसुधा कल्याणकर यांच्यासह सचिव मंडळाच्या अन्य सदस्या उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post